कोरोनाच्या (covid-19) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम व्यक्त करण्यात येत होता. मात्र, यावर आता शालेय शिक्षण (education department) विभागानं स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यातील शाळा १५ जूनलाच सुरु होतील. तसेच विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक असणार नाहीत, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलं आहे. मंत्री गायकवाड म्हणाल्या, आम्ही कोविडच्या स्थितीचा आढावा घेत आहोत. पण कोविडच्या योग्य नियमावलींसह आम्ही १५ जून रोजी शाळा सुरु करणार आहेत. (Schools will start on 15 june) शाळेत येताना विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक असणार नाही. यापार्श्वभूमीवर नव्या एसओपीज जाहीर करण्यात येतील. तसेच पुढील निर्णय हे परिस्थिती पाहुन घेतले जातील, असंही शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं.
शाळा 15 जूनपासून सुरु! विद्यार्थ्यांना मास्क सक्ती नाही!- वर्षा गायकवाड
June 06, 2022
0
Tags

Post a Comment
0 Comments