Type Here to Get Search Results !

लोकमान्य विद्यालयाला जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जळगाव मा.श्री.नितिन बच्छाव साहेब यांची सदिच्छा भेट! 

 

अमळनेर: लोकमान्य विद्यालय, अमळनेर येथे आज दि.30 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जळगाव मा.श्री.नितिन बच्छाव साहेब यांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली. सदर भेटीमध्ये साहेबांनी विद्यालयातील विविध विभागाची माहिती घेतली तसेच विद्यालयात चालू असलेल्या हरित सेनेच्या अंतर्गत चित्रदुर्गा या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी श्री नितीन बच्छाव साहेब यांचा सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष अरविंद फुलपगारे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संस्थेचे चिटणीस विवेकजी भांडारकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रविंद्र लष्करे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments