Type Here to Get Search Results !

कवि अजय भामरे यांचा सत्कार!


अमळनेर, प्रतिनिधी- स्व.बाबासाहेब के.नारखेडे स्मृती राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली होती.सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी प्रभाकर हाॅल , भुसावळ येथे पार पडला. सदर राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत शिक्षक,कवी तथा पत्रकार अजय भामरे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मकरंद नारखेडे,प्रमुख अतिथी डॉ अनिल झोपे (प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,जळगाव) संस्था उपाध्यक्ष डॉ किशोर एन.नारखेडे, डॉ संजीव एन नारखेडे, सेक्रेटरी पी.व्ही.पाटील,प्रमोद नेमाडे,भाग्येश नारखेडे, विकास पाचपांडे,प्रमोद नेमाडे, मुख्याध्यापक नितीन किरंगे,रमण भोळे आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments